Sharad Pawar: "माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली", जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:16 AM2022-08-08T10:16:06+5:302022-08-08T10:30:47+5:30

मी दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो. त्यावेळी, लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ओबीसींसंदर्भात चर्चा केली.

Sharad Pawar: Sharad Pawar and BJP's friendship is better than mine, Mahadev Jankar's statement from Delhi | Sharad Pawar: "माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली", जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम

Sharad Pawar: "माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली", जानकरांनी दिल्लीतून सांगितलं मित्रप्रेम

googlenewsNext

नवी दिल्ली - आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपानं तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यात शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या बारामतीवर भाजपानं लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीच्या दौऱ्यावर असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यात आता महादेव जानकर यांनीही भाजपला मोलाचा सल्ला दिला आहे. जर योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा पराभव अटळ आहे, असं जानकर यांनी म्हटलं. तसेच, दिल्ली दौऱ्यावर असताना अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठीही ते घेत आहेत.

मी दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो. त्यावेळी, लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ओबीसींसंदर्भात चर्चा केली. सध्या, आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, मंत्रिमंडळावर कुठलीही चर्चा केली नसल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणार का? असा प्रश्न जानकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, राजकारणात जर-तरला किंमत नाही. मी सध्या एनडीएसोबत आहे, त्यामुळं या बोलण्याला अर्थ नाही. दिल्लीत शरद पवारांची भेट होती. देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट होती, रामदास आठवलेंच्या घरी जेवायलो जातो, असे म्हणत आपले संबंध सर्वपक्षीय चांगले असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. तसेच, जानकर पवारांच्या जवळ आहेत का? या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. असं काही नाही, माझ्यापेक्षा पवार साहेबांची आणि भाजपची दोस्ती चांगली आहे, असे जानकर म्हणाले. 

भाजपने हा मतदारसंघ रासपला द्यावा

महादेव जानकर म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एकाबाजूला धरण आणि दुसऱ्याबाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडली अशी अवस्था आहे. इंदापुर तालुक्यातील ३२ आणि बारामतीतील २६ गावांच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मुळशी, दौंड याठिकाणीही समस्या प्रलंबितच आहे. निर्मला सीतारामन या बारामतीत लक्ष देत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे. बारामतीच्या जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. मला पावणे पाच लाख मतदान केले होते. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. भाजपानं रासपला हा मतदारसंघ द्यायला हवा होता. २०१९ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झाले नव्हते हेदेखील पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवारांच्या दृष्टीने भाजपाने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे हा माझा सल्ला आहे असं त्यांनी म्हटलं. 
 

 

Web Title: Sharad Pawar: Sharad Pawar and BJP's friendship is better than mine, Mahadev Jankar's statement from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.