हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:58 AM2023-10-19T08:58:40+5:302023-10-19T09:03:38+5:30
इस्त्रायल आणि हमास यांच्या गेल्या काही दिवसापासून युद्ध आहे.
गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी युद्धाच्या मुद्द्यावरुन भारत सरकारच्या भूमिकेबद्दल म्हणाले होते, मला वाटत नाही की भारत सरकार इस्रायलला १०० टक्के पाठिंबा देत आहे. भारत सरकारचे अधिकृत विधान पाहिल्यास, भारत सरकार इस्रायलसोबत १००% नाही. त्यांच्या वक्तव्यावरून असे दिसते पण पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून ते इस्रायलसोबत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या प्रकरणी कोणताही निर्णय घेताना सरकारने अफगाणिस्तान, इराण, यूएई आणि आखाती देशांकडे दुर्लक्ष करू नये, असंही पवार म्हणाले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जोरदार टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड भेट; चर्चांना आले उधाण
हिमंता सरमा म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना गाझामध्ये हमाससाठी लढायला पाठवावे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पवार यांच्यावर टीका केली. गडकरी म्हणाले, "शरद पवार यांनी दिलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र निषेध करतो, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट निषेध केला आहे. भारत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात सातत्याने उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी आमच्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
पियुष गोयल यांनीही केली टीका
गडकरींशिवाय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही निषेध केला आहे. इस्रायल-गाझा युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानावर बुधवारी आक्षेप घेतला. पियुष गोयल म्हणाले की, दहशतवादाच्या धोक्याचा सर्व प्रकारात निषेध केला पाहिजे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते बेताल वक्तव्य करतात, तेव्हा ते अतिशय अस्वस्थ करणारे आहे. जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या दहशतवादाच्या धोक्याचा सर्व प्रकारांनी निषेध केला पाहिजे. गोयल यांनी ट्विटरवर पोस्ट केली “संरक्षण मंत्री तसेच भारताचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा दहशतवादाशी संबंधित मुद्द्यांवर असा अनौपचारिक दृष्टिकोन आहे हे दुःखद आहे. ही मानसिकता थांबवायला हवी, असं ट्विट गोयल यांनी केले आहे.