शरद पवारांचं चुकलंच; राजीनामा मागे घेणार नाहीः तारिक अन्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:18 AM2018-09-29T11:18:16+5:302018-09-29T11:37:18+5:30

काँग्रेसमध्ये जायचं असल्यास पवार साहेबांशी चर्चा करून गेलो असतो. परंतु त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मला पक्ष सोडावा लागला आहे.

Sharad Pawar's mistake; Will not withdraw resignation: Tariq Anwar | शरद पवारांचं चुकलंच; राजीनामा मागे घेणार नाहीः तारिक अन्वर

शरद पवारांचं चुकलंच; राजीनामा मागे घेणार नाहीः तारिक अन्वर

Next

नवी दिल्ली- काँग्रेसमध्ये जायचं असल्यास पवार साहेबांशी चर्चा करून गेलो असतो. परंतु त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मला पक्ष सोडावा लागला आहे. राफेल डीलमध्ये पवारांनी मोदींची बाजू घेतली आहे. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले आहेत. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तारिक अन्वर यांनी हे विधान केलं आहे. 

कुठल्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही. पवार साहेबांचं हे विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती.

राजीनामा दिल्यानंतर पवार साहेबांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. पवार साहेबांसाठी असलेला आदर कायम राहील. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे. 

Web Title: Sharad Pawar's mistake; Will not withdraw resignation: Tariq Anwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.