केरळमध्ये शरद पवारांचा दे धक्का ! राष्ट्रवादीने जिंकल्या 2 जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 01:29 PM2016-05-19T13:29:49+5:302016-05-19T14:22:07+5:30
केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याने शरद पवारांनी अनपेक्षित धक्का दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
तिरुअनंतपूरम, दि. 19 - केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याने शरद पवारांनी अनपेक्षित धक्का दिला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. 140 सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना 85 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे.
कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस चांडी यांनी 4891 मतांनी विजय मिळवत काँग्रेस उमेदवार अडव्होकेट जेकब इब्राहम यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए के ससींद्रन यांनी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) किशन चंद यांचा 29057 मतांनी पराभव केला आहे.