तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचं लायसन्स रद्द
By admin | Published: June 17, 2017 04:50 PM2017-06-17T16:50:10+5:302017-06-17T16:50:10+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचं लायसन्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने रद्द केलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 17- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या पेट्रोल पंपाचं लायसन्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने रद्द केलं आहे. तेज प्रताप यादव यांनी चुकीच्या पद्धतीने लायसन्स घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तेज प्रताप यादव बिहार सरकारमध्ये आरोग्य मंत्री आहेत.
तेज प्रताप यादव पाटणामधील बेऊर जेलजवळ पेट्रोल पंप मंजूर करण्यात आला होता. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी यावर आक्षेप घेत २०११ मध्ये पाटणामधील पेट्रोल पंपाचं लायसन्स मिळवताना तेज प्रताप यादव यांनी खोटी कागदपत्रे सादर केली होती, असं सांगत त्याचा पुरावा सादर केला होता. तेल कंपनीच्या एका अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून तेज प्रताप यादव यांनी पेट्रोल पंपाचं लायसन्स मिळवल्याची चर्चा सुरू आहे. या आरोपानंतर कंपनीने तेज प्रताप यांना नोटीसही पाठवली होती
भाजपच्या आरोपानंतर भारत पेट्रोलियमने तेज प्रताप यादव यांना नोटीस पाठवली होती. तसंच १५ दिवसात स्पष्टीकरण द्यायला सांगितलं होतं. . पण या प्रकरणात बीपीसीएलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
खरंत याआधीसुद्धा तेज प्रताप यादव वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सरकारी हॉस्पिटलमधील ३ डॉक्टर आणि पारिचारीकांना घरात ड्युटी लावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.