नोटाबंदीमुळे तीन कोटी लोकांचा गेला रोजगार,शेतकरी व तरुण अडचणीत:शरद यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:54 AM2017-09-05T00:54:04+5:302017-09-05T00:54:55+5:30

नोटाबंदीमुळे शेतकरी, तरुण अडचणीत सापडले. तीन कोटी लोकांचा रोजगार गेला, अशी टीका जनता दल (यू) चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी केला.

Sharad Yadav: Employment, farmers and youths facing three crore people due to Nodbing | नोटाबंदीमुळे तीन कोटी लोकांचा गेला रोजगार,शेतकरी व तरुण अडचणीत:शरद यादव

नोटाबंदीमुळे तीन कोटी लोकांचा गेला रोजगार,शेतकरी व तरुण अडचणीत:शरद यादव

Next

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे शेतकरी, तरुण अडचणीत सापडले. तीन कोटी लोकांचा रोजगार गेला, अशी टीका जनता दल (यू) चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी केला. असंघटित क्षेत्रातील छोटे धंदे बंड पडले असून, जीडीपीही आपटल्याचा टोला त्यांनी लगावला.
नोटाबंदीच्या निर्णयाचा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिन म्हणून ओळखला जाईल, अशी टीका करून यादव म्हणाले की, नोटाबंदीचा सरकारचा निर्णय पूर्णपणे अयशस्वी ठरला. केंद्राने जो दावा केला होता, त्यापैकी एकही हेतू त्यातून पूर्ण झाला नाही. नोटाबंदीमुळे १२0 लोकांचा मृत्यू झालाच, पण कृषी क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसू लागले आहे.

Web Title: Sharad Yadav: Employment, farmers and youths facing three crore people due to Nodbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.