शरीफ मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:02 AM2018-07-24T00:02:54+5:302018-07-24T00:03:09+5:30
तुरुंगातून रुग्णालयात हलविले जाण्याची शक्यता
इस्लामाबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करुन रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात रवानगी करण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे हृदय व मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस त्यांची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकाने केली आहे.
निवृत्त जनरल अझहर किरानी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने अडियाला तुरुंगात जाऊन शरीफ यांची तपासणी केली.
शरीफ यांना हृदयविकाराचा
त्रास गेल्या अनेक वर्षांपासून असून त्यांना उच्चरक्तदाबाचाही आजार आहे. त्याचा त्यांच्या मूत्रपिंडांवरही काही प्रमाणात परिणाम झाला
आहे. त्यांच्या रक्तातील पाण्याचे प्रमाण खूप कमी व युरियाचे
प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांची मुत्रपिंडे निकामी होण्याचाही धोका संभवतो.