शरीफ यांची कबुली ‘गंभीर’, संरक्षणमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:21 AM2018-05-14T02:21:36+5:302018-05-14T02:21:36+5:30

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून

Sharif's confession 'critical', defense minister Sitaraman's rendition | शरीफ यांची कबुली ‘गंभीर’, संरक्षणमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

शरीफ यांची कबुली ‘गंभीर’, संरक्षणमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

Next

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवला ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिलेली कबुली ‘गंभीर’ असून त्याने भारताने आजवर सातत्याने जगापुढे मांडलेली भूमिकाच खरी होती याला पुष्टी मिळते, असे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी सांगितले.
सितारामन म्हणाल्या, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या ‘मास्टर मार्इंड’ने पाकिसातमधून सूत्रे हालविली व ज्यांच्याकरवी हा कट प्रत्यक्षात उतरविला गेला ते ‘हँडलर’ही पाकिस्तानचेच होते, अशीच ठाम भूमिका भारताने प्रथमपासून जगापुढे मांडली आहे. ती खरी ठरली आहे.

तहरीक-ए-इन्सानियत पक्षाचे अध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘ नवाज शरीफ हे स्वत:च्या मायभूमीशी गद्दारी करून स्वार्थासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी करणाऱ्या मिर जाफरचे आधुनिक अवतार आहेत. मुलांच्या परदेशांतील कंपन्यांमध्ये ठेवलेला ३०० अब्ज रुपयांचा काळा पैसा वाचविण्यासाठी शरीफ सरळसरळ मोदींचे भाषा बोलत आहेत.’

Web Title: Sharif's confession 'critical', defense minister Sitaraman's rendition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.