रामदेव बाबांसोबत स्टेज शेअर केल्याने मुस्लिम योगा शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 12:20 PM2017-11-10T12:20:43+5:302017-11-10T12:24:55+5:30

योगाचं शिक्षण देणारी मुस्लिम तरूणी योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने चांगलीच अडचणीत आली आहे.

 Sharing the stage with Baba Ram Baba threatens to kill the Muslim Yoga teacher | रामदेव बाबांसोबत स्टेज शेअर केल्याने मुस्लिम योगा शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

रामदेव बाबांसोबत स्टेज शेअर केल्याने मुस्लिम योगा शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

Next
ठळक मुद्दे योगाचं शिक्षण देणारी मुस्लिम तरूणी योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने चांगलीच अडचणीत आली आहे.योग दिनाच्या दिवशी बाबा रामदेव यांच्यासोबत योगा केल्याने प्रसिद्ध झालेल्या राफिया नाज या तरूणीला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

रांची- योगाचं शिक्षण देणारी मुस्लिम तरूणी योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने चांगलीच अडचणीत आली आहे. योग दिनाच्या दिवशी बाबा रामदेव यांच्यासोबत योगा केल्याने प्रसिद्ध झालेल्या राफिया नाज या तरूणीला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसंच काही मुस्लिम लोकांनी तिच्याविरोधात तोंडी फतवाही जारी केला आहे. राफिया नाज हिला येत असलेल्या धमक्यांमुळे झारखंड पोलिसांनी राफियासाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत. 

राफिया नाजचा रामदेव बाबांबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली. तिला फेसबुकवरही जीवे मारण्याची धमकी दिली जाते आहे. नाजियाला दोन सुरक्षारक्षक दिले गेले आहेत.  योगाभ्यास सुरू ठेवला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी तिला मिळाली आहे. 

राफियाला झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या सुरक्षारक्षकांमध्ये एक महिला आणि एका पुरूष पोलीसाचा समावेश आहे. राफियाला येत असलेल्या धमक्यांमुळे तिचे आई-वडिलही घाबरले आहेत. इतकंच नाही, तर बुधवारी राफियाच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. घरातून बाहेर आल्यावर काही लोक मला योगा सोडण्याची बळजबरी करतात, असं राफियाने म्हंटलं आहे. धमक्यांमुळे राफिया गेल्या काही दिवसांपासून तणावात आहे.
 

Web Title:  Sharing the stage with Baba Ram Baba threatens to kill the Muslim Yoga teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.