तीन मराठी कामगारांना ‘श्रमभूषण’ पुरस्कार

By admin | Published: January 25, 2017 01:03 AM2017-01-25T01:03:22+5:302017-01-25T01:03:22+5:30

केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सन २०१५ साठीचे पंतप्रधानांचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना मंगळवारी जाहीर केले.

'Sharmabhushan Award' for three Marathi workers | तीन मराठी कामगारांना ‘श्रमभूषण’ पुरस्कार

तीन मराठी कामगारांना ‘श्रमभूषण’ पुरस्कार

Next

हरिश गुप्ता / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सन २०१५ साठीचे पंतप्रधानांचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना मंगळवारी जाहीर केले. यापैकी तीन कामगार/कर्मचारी मराठी आहेत.
एम. रामकृष्णन (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स -भेल), श्रीमती अभिलाशा पेठे ( स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया- सेल), श्यामसुंदर गंगाराम पाडेकर (लार्सन अ‍ॅण्ड ट्युब्रो, मुंबई) आणि रतनकुमार शामराव कांबळे (बजाज आॅटो, औरंगाबाद) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उपक्रम आणि ५०० हून अधिक कर्मचारी असलेले खासगी कारखाने यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमधून दरवर्षी ‘श्रमरत्न’, ‘श्रमभूषण’, ‘श्रमवीर /श्रम विरांगना’ आणि ‘ श्रमश्री/ श्रमदेवी’ अशा विविध वर्गा तील पुरस्कारांचे विजेते निवडले जातात. सन २०१५ साठी ‘श्रमरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणालाही जाहीर झालेला नाही. चौघांना ‘श्रमभूषण’, २४ जणांना श्रमवीर /श्रम विरांगना’ व २८ जणांना ‘श्रमश्री/ श्रमदेवी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Web Title: 'Sharmabhushan Award' for three Marathi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.