हिंदूंवरील हल्ल्याचा मुद्दा प्रखरपणे मांडा
By admin | Published: November 7, 2016 07:00 AM2016-11-07T07:00:47+5:302016-11-07T07:00:47+5:30
बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्याचा मुद्दा त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडे उपस्थित करा, अशा सूचना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ढाकास्थित भारतीय उच्चायुक्तांना दिल्या आहेत.
नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्याचा मुद्दा त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडे उपस्थित करा, अशा सूचना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ढाकास्थित भारतीय उच्चायुक्तांना दिल्या आहेत.
याबाबत सुषमा स्वराज यांनी व्टिट केले आहे की, बांगलादेशातील हिंंदुंच्या सुरक्षेसाठी हा विषय पंतप्रधानांच्या समक्ष उपस्थित करण्यास सांगितले आहे. बांगलादेशात ताज्या घटनेत अज्ञात लोकांनी हिंदुंच्या काही घरांना आग लावली आणि दोन मंदिरात तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीच येथे हिंदुंना लक्ष्य करण्यात आले होते.
या घडामोडी ब्राह्मणबरिया जिल्ह्यात झाल्या आहेत. इस्लाम धर्माबाबतच्या एका फेसबूक
पोस्टनंतर हा तणाव झाला. १५ मंदिर आणि २० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर अनेक हिंदु नागरिकांनी स्थलांतर केले आहे. ब्राह्मणबरियातील घटनेनंतर पोलिसांनी ३३ जणांना ताब्यात घेतले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)