शशीकलांचा भाचा दिनाकरनला अटक
By admin | Published: April 26, 2017 06:57 AM2017-04-26T06:57:04+5:302017-04-26T07:10:01+5:30
शशिकला यांचा भाचा आणि अण्णा द्रमुक पक्षाचे नेता टी.टी.व्ही दिनाकरन यांना दिल्ली क्राइम ब्रांचने मंगळवार रात्री उशीरा अटक केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - शशिकला यांचा भाचा आणि अण्णा द्रमुक पक्षाचे नेता टी.टी.व्ही दिनाकरन यांना दिल्ली क्राइम ब्रांचने मंगळवार रात्री उशीरा अटक केली. पार्टीच्या निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना लाच देण्याचा दिनाकरन यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या 4 दिवसांपासून दिनाकरनची चौकशी केली जात होती. चौथ्या दिवशी मंगळवारी त्याची सलग सातहून अधिक तास चौकशी सुरू होती. दिनकरन यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे पोलिसांनी दिनकरन याला रात्री उशिरा अटक केली.
आज दुपारी पोलीस दिनाकरन यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात हजर करणार आहेत. न्यायालयात हजर करण्याआधी दिनाकरनची सफदरगंज रूग्णालयात वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. याप्रकरणी दिनकरनचा मित्र मल्लिकार्जुन यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी मल्लिकार्जुनने दिनाकरनची मदत केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण-
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला आणि माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यात पक्षाचं मुळ चिन्ह मिळवण्यासाठी वाद सुरू आहे. मूळ चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न दिनाकरन यांनी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडणा-या सुकेश चंद्रशेखर याला पोलिसांनी यापुर्वी अटक केली असून न्यायालयाने त्याची 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. सुकेशला दिनाकरनने 60 कोटींची ऑफर दिली होती असं बोललं जात आहे. दिनाकरनने सुकेश चंद्रशेखरला भेटल्याचं मान्य केलं आहे. मात्र, पैसे देण्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.