शशी कपूर यांना फाळके पुरस्कार

By admin | Published: March 24, 2015 02:35 AM2015-03-24T02:35:49+5:302015-03-24T02:35:49+5:30

शंभरावर चित्रपटात अजरामर भूमिका साकारणारे ‘जंटलमन हीरो’ आणि निर्माते शशी कपूर यांना सोमवारी सर्वोच्च मानाचा दादासाहेब फ ाळके पुरस्कार जाहीर झाला.

Shashi Kapoor received the Phalke Award | शशी कपूर यांना फाळके पुरस्कार

शशी कपूर यांना फाळके पुरस्कार

Next

जंटलमनचा सन्मान : कपूर घराण्यातील तिसरे मानकरी
नवी दिल्ली : बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत कारकीर्द सुरू करणारे आणि यानंतर ‘नमक हलाल’, ‘दिवार’, ‘कभी कभी’ अशा शंभरावर चित्रपटात अजरामर भूमिका साकारणारे ‘जंटलमन हीरो’ आणि निर्माते शशी कपूर यांना सोमवारी सर्वोच्च मानाचा दादासाहेब फ ाळके पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवारे ते ४६ वे व्यक्ती असतील.
हा पुरस्कार वर्ष २०१४ साठीचा असून सुवर्णकमळ, १० लाख रुपये रोख आणि शाल असे त्याचे स्वरूप आहे. ७७ वर्षीय शशी कपूर हे त्यांचे पिता पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यानंतर हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करणारे त्यांच्या कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. किडनीच्या आजारामुळे चालणे-फिरणे अशक्य असल्याने अलीकडच्या वर्षांत ते व्हिलचेअरला खिळलेले आहेत.

Web Title: Shashi Kapoor received the Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.