शशी थरुर यांना अटक व सुटका
By admin | Published: January 6, 2017 06:50 PM2017-01-06T18:50:40+5:302017-01-06T19:10:56+5:30
नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने सुटका केली.
Next
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 06 - नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यासह कार्यकर्त्यांना केरळ पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने थरूर यांची सुटका केली.
"रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गेटसमोर शांतपणे आंदोलन सुरू असताना मला आणि माझ्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी कोणताही आरोप न लावता आमची सुटका केली," असे खासदार शशी थरुर यांनी सांगितले. केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांना सुद्धा अटक करण्यात आली होती.
कॉंग्रेसने नोटाबंदीच्या विरोधात संपूर्ण केरळात आज आंदोलन पुकारले होते. आंदोलन करण्यासाठी तिरुअनंतपुरम येथील सेन्ट्रल बॅंकेच्यासमोर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडले आणि बॅंकेच्या आवारात जाण्याचा प्रयत्न केले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाल्याचे समजते.
There was no breach of peace or violence by any protestor.But we were arrested outside @RBI gate, taken to police camp&released w'out charge pic.twitter.com/z11YY6r8Sh
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) 6 January 2017