CAA Protest : शशी थरूरांनी केजरीवालांसाठी वापरला 'किन्नर' शब्द अन् मागितली माफी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:19 PM2020-01-14T16:19:35+5:302020-01-14T16:25:04+5:30
CAA Protest : शशी थरूर एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी किन्नर (Eunuch) शब्द वापरला आहे. अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता पाहिजे. किन्नर असे अनेक वर्षांपासून करत आहेत, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यानंतर शशी थरूर यांनी याबाबत माफीही मागितली आहे.
शशी थरूर एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेबद्दल शशी थरूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "अरविंद केजरीवाल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे आपल्या बाजूला करू पाहत आहेत. आम आदमी पार्टीचे नेता दोन्ही बाजूने फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अरविंद केजरीवाल केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. मात्र, याविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेत नाही."
याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून असा किन्नरांना विशेष अधिकार आहे. असा अप्रभावी दृष्टीकोन मुख्यमंत्री म्हणून त्यांची जागा सुरक्षित ठेवेल, असेही शशी थरूर म्हणाले. दरम्यान, शशी थरुर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
Apologies to those who found my quote about "power without responsibility" offensive. It's an old line from British politics, going back to Kipling & PrimeMinister Stanley Baldwin, &most recently used by Tom Stoppard. I recognize that its use today was inappropriate &withdraw it.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 13, 2020
दरम्यान, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्याअसलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या
Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात
दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला
ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...