शशी थरूर यांनी गाजवले आॅक्स्फर्ड
By admin | Published: July 24, 2015 12:28 AM2015-07-24T00:28:34+5:302015-07-24T00:28:34+5:30
होय, तुम्ही भारताचे आणि वसाहतींचे देणे लागता असे स्पष्ट शब्दांमध्ये आॅक्स्फर्ड डिबेटमध्ये इंग्लंडला ठणकावून सांगणाऱ्या खासदार
नवी दिल्ली : होय, तुम्ही भारताचे आणि वसाहतींचे देणे लागता असे स्पष्ट शब्दांमध्ये आॅक्स्फर्ड डिबेटमध्ये इंग्लंडला ठणकावून सांगणाऱ्या खासदार शशी थरूर यांची सध्या सोशल मीडियासह सर्वत्र प्रशंसा होत आहे. थरूर यांचे वक्तृत्व, त्यांनी मांडलेले मुद्दे याचे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.
केवळ पंधरा मिनिटांच्या या भाषणामध्ये थरूर यांनी भारत ही इंग्रजांची पैसे देणारी दुभती गाय कशी होती आणि दोनशे वर्षांच्या काळात भारताच्या जोरावर इंग्लंडचा कसा विकास झाला हे मांडले. शशी थरूर यांचे हे भाषण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वाहिन्यांनी प्रसारित तर केलेच, त्याहून ते टष्ट्वीटर, फेसबुक आणि यू ट्यूबवरूनही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. मुद्द्यांनंतर मुद्दे, उत्कृष्ट शैली, नर्मविनोद आणि आधीच्या वक्त्यांचा घेतलेला संयत समाचार अशा विशेष समीकरणामुळे थरूर यांचे हे भाषण अधिकच नावाजले गेले.
मोदी यांनी या भाषणातून सर्व भारतीयांच्या भावना मांडल्या गेल्या अशा शब्दांमध्ये त्यांची पाठ थोपटली आहे. थरूर यांचा आजवरचा अनुभव, वाचन आणि प्रभावी सादरीकरणाच्या मिलाफातून तयार झालेल्या भाषणाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)