कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 01:58 PM2018-10-15T13:58:49+5:302018-10-15T14:02:43+5:30
राम मंदिरसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
नवी दिल्ली- राम मंदिरसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे. हिंदू लोक अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधलं जावं, असं वाटणार नाही. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018''मध्ये शशी थरूर बोलत होते. त्यानंतर भाजपानंही शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.
अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये, यासाठी काँग्रेस नेते असं वादग्रस्त विधानं करत असतात. ते जाणूनबुजून एका समुदायाला संदेश देऊ इच्छितात की, राम मंदिर पुनर्निर्माण होऊ नये, असं भाजपा नेते नरसिंहा म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांनी शशी थरूर यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तर विश्व हिंदू परिदषेचे सुरेंद्र जैन यांनी शशी थरूर यांच्या विधानावर टीका केली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला चुचकारण्यासाठीच काँग्रेस नेते अशी विधानं करतात.
'द पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर' हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले. याच पुस्तकासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी अशा एका इंग्रजी शब्दाचा वापर केला होता, जो पाहता केवळ त्याचा अर्थ समजणं तर दूरच राहिले. साधा त्याचा उच्चार करणंदेखील युजर्सना कठीण झालंय. परिणामी, या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी युजर्सनी डिक्शनरीची मदतही घेतली. पण उपाय शून्यच कारण याचा अर्थ काही केल्या सापडेना.
अखेर युजर्संनी थरुर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'तुम्ही वापरलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीची मदत घेत आहोत', असे ट्विट करत नेटीझन्स थरुर यांना ट्रोल केले होते. विशेष म्हणजे कोणत्याही डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ मिळत नाहीय. पंतप्रधान मोदींसंदर्भात ट्विट करत त्यांनी floccinaucinihilipilification ( फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन) या शब्दाचा वापर केला होता.