शशी थरूर यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी
By admin | Published: October 14, 2014 01:46 AM2014-10-14T01:46:58+5:302014-10-14T01:46:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना महागात पडल़े काँग्रेसने सोमवारी त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली़
Next
नरेंद्र मोदींची प्रशंसा भोवली : केरळ प्रदेश काँग्रेसने केली होती कारवाईची शिफारस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणो माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना महागात पडल़े काँग्रेसने सोमवारी त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली़
काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी एक निवेदन जारी करून या निर्णयाची माहिती दिली़ काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने घेतलेल्या निर्णयावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले असून थरूर यांचे प्रवक्तेपद काढून घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितल़े
गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेगवेगळ्या मुद्यांवरून वारंवार स्तुती चालवली होती़ मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती़ मोदींनी थरूर यांना या अभियानात सामील होण्याचे जाहीर निमंत्रणही दिले होत़े विशेष म्हणजे राजकीय विरोधक असलेल्या मोदींचे हे निमंत्रण थरूर यांनी स्वीकारले होत़े थरूर यांनी चालवलेले मोदींचे कौतुक न रुचल्याने केरळ प्रदेश काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती़ थरूर यांनी मोदींच्या चालवलेल्या प्रशंसेमुळे केरळमधील काँग्रेस कार्यकर्ते दुखावले आहेत़
बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना पक्षप्रवक्ते पदावरून मुक्त करण्याच्या निर्णयाचे केरळ प्रदेश काँग्रेस समितीने (केपीसीसी) समर्थन केले आह़े खुद्द शशी थरूर यांनीही पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले आह़े
च्केरळ प्रदेश काँग्रेस समितीने लावलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख आहे; पण आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य आह़े माङयाकडून हा मुद्दा इथेच संपला आहे, असे थरूर यांनी टि¦टरवरील आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आह़े