महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना चुकले शशी थरूर, नेटिझन्सने केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 12:43 PM2018-03-29T12:43:18+5:302018-03-29T12:43:18+5:30

काँग्रेस नेते शशी थरूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

shashi tharoor tweeted a picture of mahatma buddha on mahavir-jayanti | महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना चुकले शशी थरूर, नेटिझन्सने केलं ट्रोल

महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना चुकले शशी थरूर, नेटिझन्सने केलं ट्रोल

Next

नवी दिल्ली- सोशल मीडिया साइट्सवर अतिशय अॅक्टीव्ह असणारे काँग्रेस नेते शशी थरूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. गुरूवारी सकाळी शशी थरूर यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो ट्विट केला. या फोटोवरून त्यांना ट्रोल केलं जातंय. शशी थरूर यांनी भगवान महावीर यांचा फोटो ट्विट करण्याऐवजी भगवान बुद्ध यांचा फोटो ट्विट केला. सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यावर शशी थरूर यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. 



 



 



 



 

शशी थरूर यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छांचं ट्विट करताना एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. पण त्याफोटोमध्ये भगवान महावीर नव्हते तर तो फोटो भगवान बुद्धांचा होता. लगेचच नेटिझन्सनी शशी थरूर यांना चूक लक्षात आणून दिली. शशी थरूर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. दुसरं ट्विट करत फोटो कुठला आहे? हे थरूर यांनी सांगितलं. एका वृत्त संस्थेचा तो फोटो असल्याचं शशी थरूर म्हणाले. 



 

शशी थरूर यांची सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. याधीही हिंदीमध्ये केलेल्या एका ट्विटमुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर होते. शशी थरूर यांनी केलंल हिंदीतील ट्विट अनेकांना आवडलं तर काहींनी शशी थरूर यांच्यावर टीकाही केली होती. 
 

Web Title: shashi tharoor tweeted a picture of mahatma buddha on mahavir-jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.