"मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेची होतेय हानी’’, शशी थरूर यांचं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 21:35 IST2023-05-30T21:34:33+5:302023-05-30T21:35:22+5:30
Shashi Tharoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियस बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांचं नवं पुस्तक रिंगसाइड अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँडचं प्रकाशन झालं.

"मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेची होतेय हानी’’, शशी थरूर यांचं परखड मत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियस बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांचं नवं पुस्तक रिंगसाइड अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँडचं प्रकाशन झालं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. शशी थरूर यांनी लोकमत समूह हा निष्पक्षपणे वार्तांकन करत असल्याचं सांगत लोकमत समुहाचं कौतुक केलं. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये चालणाऱ्या मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेची हानी होत, असल्याचं परखड मत मांडलं.
डॉ. शशी थरूर म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये चालणाऱ्या मीडिया ट्रायलमुळे माहिती आणि विश्वासार्हतेचं नुकसान होत आहे. प्रसारमाध्यमातील जागल्याची भूमिका बजावणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार आणि लेखक डॉ. संजर बारू हेसुद्धा उपस्थित होते.
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांचे नवीन पुस्तक ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’चे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज झालं. हे पुस्तक डॉ. दर्डा यांच्या साप्ताहिक लेखांचे संकलन असून, त्यांनी हे लेख २०११ ते २०१६ दरम्यान ‘लोकमत’ व देशातील प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक दैनिक वृत्तपत्रांत प्रकाशित केले होते.
‘रिंगसाइड’मध्ये विज्ञान, पर्यावरण, अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक विकास, क्रीडा, कला, संस्कृती, विदेशी धोरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर केलेले शोधपूर्ण लेखन आहे. यात प्रसिद्ध व्यक्तींवर लिहिलेल्या लेखांचाही समावेश आहे, ज्यांनी देश व जगात सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे.