शशिकला यांनी भावूक होत स्विकारला पक्षाचा पदभार
By admin | Published: December 31, 2016 06:01 PM2016-12-31T18:01:07+5:302016-12-31T18:01:07+5:30
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची मैत्रीण म्हणून परिचित असलेल्या शशिकला नटराजन यांनी शनिवारी अद्रमुकच्या सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 31 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची मैत्रीण म्हणून परिचित असलेल्या शशिकला नटराजन यांनी शनिवारी अद्रमुकच्या सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांना गहिवर अनावर झाला. जयललिता यांचे निधन झाल्यामुळे पक्षाचे सरचिटणीसपद रिक्त झाले होते. त्या जागी शशिकल यांची एकमताने निवड करण्यात आली होती. या पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून भावपूर्ण भाषण केली. जयललिता यांच्या आठवणी जागवताना त्यांना रडू कोसळले.
शशिकला म्हणाल्या की, 'अम्मा (जयललिता) आता आपल्यात नाहीत. त्यांनी ७५ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र देवाने आपल्या लेकराला आपल्याकडे बोलावून घेतले. अम्मा यांचे त्यांचे कार्य आपल्यासोबत आहे. त्याबळावर आपला पक्ष तामिळनाडूत पुढील १00 वर्षे राज्य करेल'. शशिकला म्हणाल्या की, 'मी २९ वर्षांची होते तेव्हापासून जयललिता यांच्यासोबत होते. जयललिता या माझे जीवनच होत्या. अद्रमुकचे नेतृत्व करताना जयललिता यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच मी वाटचाल करीन. पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ आहे. कार्यकर्त्यांचा आपणास पाठिंबा मिळत राहील, याचा मला विश्वास आहे'.
#WATCH: Sasikala Natarajan breaks down while talking about #Jayalalithaa after taking charge as AIADMK General Secretary. pic.twitter.com/DhtSfVWKE4
— ANI (@ANI_news) 31 December 2016
Chennai: Sasikala Natarajan takes charge as AIADMK General Secretary. pic.twitter.com/V34eQmlz0O
— ANI (@ANI_news) 31 December 2016