शशिकला यांना धक्का, शिक्षणमंत्र्यांनी सोडली साथ
By admin | Published: February 11, 2017 02:22 PM2017-02-11T14:22:18+5:302017-02-11T14:22:18+5:30
सरकार स्थापनेचा प्रयत्न करणा-या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांना धक्का बसला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 11 - तामिळनाडूमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. सरकार स्थापनेचा प्रयत्न करणा-या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांना धक्का बसला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री के. पंडीयाराजन शशिकला यांची साथ सोडून ओ. पनीरसेल्वम गटात सहभागी झाले आहेत. एकदिवस आधी पंडीयाराजन शशिकला यांचे जोरदार समर्थन करत होते.
शशिकलांनी आमदारांना बंधक बनवून ठेवल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला होता. पंडीयाराजनच नव्हे तर, खासदार पीआर सुंदरम, खासदार अशोक कुमार पनीरसेल्वम यांच्या गटात सहभागी झाले आहेत. रिसॉर्टमध्ये थांबलेल्या अनेक आमदारांना शशिकला यांची साथ सोडून पनीरसेल्व यांच्यासोबत यायचे आहे असे या नेत्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान शशिकला यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. मला पाठिंबा देणा-या आमदारांना सोबत घेऊन मला आपली भेट घ्यायची आहे. संविधान, लोकशाही आणि राज्याचे हित लक्षात घेऊन तुम्ही तात्काळ पावले उचलाल असा मला विश्वास वाटतो असे शशिकला यांनी पत्रात म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांनीच शशिकलाची साथ सोडल्यामुळे पनीरसेल्वम यांची बाजू बळकट झाली आहे.