#ShashiKapoor : वयाच्या ७९व्या वर्षी निधन. आपल्या चित्रपटातून बॉलिवूडला दिली ही सुपरहीट गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:21 PM2017-12-04T19:21:06+5:302017-12-04T19:24:00+5:30
मुंबई : ज्येष्ठ अष्टपैलु अभिनेते आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते शशी कपूर यांचं काही वेळापुर्वी वयाच्या ७९व्या वर्षी आजाराने निधन झालं. ७० आणि ८०च्या दशकातला रोमँटीक आणि सर्वंकष अभिनेता अशी त्यांची ओळख होती. दिवार चित्रपटातील 'मेरे पास माँ है' या त्यांच्या अजरामर वाक्याने आजही त्यांना ओळखलं जातं. अनेक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारत असताना त्यांनी अतिशय सुमधूर गाणी बॉलिवूडला दिली. पाहुयात त्यांच्या चित्रपटातील त्यांची टॉप १० लोकप्रिय गाणी.
१) परदेसीयों से ना अखियाँ मिलाना - जब जब फूल खिले.
गायिका - लता मंगेशकर, संगितकार - कल्याणजी आनंदजी
२) ले जाएंगे ले जाएंगे - चोर मचाएँ शोर
अभिनेत्री - मुमताज , संगीतकार - रवींद्र जैन
३) वादा करो नहीं छोडोगे मेरा साथ - आ गले लग जा
अभिनेत्री -शर्मिला टागोर , गायक - किशोर कुमार, लता मंगेशकर
४) नी सुलताना रे - प्यार का मौसम
अभिनेत्री - आशा पारेख , गायक- मोहम्मद रफी , लता मंगेशकर
५) तेरा मुझसे है पहले का नाता कोई - आ गले लग जा
अभिनेत्री - शर्मिला टागोर , गायक - किशोर कुमार
६) जवानी जानेमन - नमक हलाल
अभिनेत्री - परवीन बाबी , गायिका - आशा भोसले
७) कभी कभी मेरे दिल मैं - कभी कभी
अभिनेत्री - राखी , गायक - मुकेश , लता मंगेशकर
८) मोहब्बत बडे काम की चिज है - त्रिशुल
अभिनेत्री - हेमा मालिनी , गायक - लता मंगेशकर, किशोर कुमार , येसुदास
९) रात बाकी , बात बाकी - नमक हलाल
अभिनेत्री - परवीन बाबी , गायक - आशा भोसले , बप्पी लहिरी
१०) जानेमन तुम कमाल करती हो - त्रिशुल
अभिनेत्री - हेमा मालिनी , गायक - किशोर कुमार , लता मंगेशकर