शास्त्री यांचा आयसीसी क्रिकेट समितीचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 05:48 AM2016-07-02T05:48:00+5:302016-07-02T05:48:00+5:30
टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा राजीनामा दिला आहे.
शास्त्री हे आयसीसीत मीडिया प्रतिनिधी होते. त्यांनी लॉर्ड्सवर मागच्या महिन्यात झालेल्या आयसीसी बैठकीत मात्र भाग घेतला नव्हता. ते टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाच्या शर्यतीतदेखील होते. पण, त्यांच्याकडे कानाडोळा करीत अनिल कुंबळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शास्त्री निराश झाले. या दरम्यान मुलाखतीच्यावेळी सौरभ गांगुली याने दांडी मारताच शास्त्री चिडले. यावर बराच वाद झाला. सौरभने पदाची सभ्यता पाळून माझ्या मुलाखतीच्यावेळी उपस्थित राहायला हवे होते, असे शास्त्री यांनी वक्तव्य करताच रागावलेल्या गांगुलीने शास्त्री स्वत: थायलंडमध्ये मौज करायला गेले. तेथे राहून व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे त्यांना मुलाखत देणे शोभले का, असा उलट सवाल विचारला होता.
शास्त्री यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांचे नाव आयसीसी वेबसाईटवर क्रिकेट समितीत कायम आहे, हे विशेष. (वृत्तसंस्था)
वृत्तानुसार टीम इंडियाचे कर्णधार राहिलेले शास्त्री हे या पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देऊ इच्छितात. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
५२ वर्षांचे शास्त्री यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी
चर्चा केल्यानंतरच हे पाऊल
उचलल्याचे कळते.