शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसप्रवेश नक्की; बिहारच्या नेत्याने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:51 AM2019-03-27T01:51:48+5:302019-03-27T01:52:13+5:30
भाजपाचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा येत्या गुरुवार वा शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बिहार काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंग यांनीच ही माहिती दिली आहे.
पाटणा : भाजपाचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा येत्या गुरुवार वा शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बिहार काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंग यांनीच ही माहिती दिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा गेली दोन-तीन वर्षे पंतप्रधान मोदी व भाजपावर सातत्याने टीका करीत होते. ते विरोधी नेत्यांसह व्यासपीठावरही दिसले होते. त्यामुळे त्यांना बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपा पुन्हा उमेदवारी देणार नाही, हे स्पष्टच होते.
तेथून भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी
दिली आहे. विरोधकांच्या महाआघाडीने ही जागा काँग्रेससाठी सोडली आहे. त्यामुळे शत्रुघ्न
सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्या पक्षातर्फे रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात लढतील, अशी चर्चा सुरूच होती.
शत्रघ्न सिन्हा यांनी भाजपाच्या ‘काँग्रसमुक्त भारत’ या घोषणेला उत्तर देताना ‘काँग्रेसयुक्त भारतची वेळ आता आली आहे’ असे टिष्ट्वट दोन दिवसांपूर्वी केलेच होते.