ती भक्त परदेशातून आली, बागेश्वर बाबांना पाहताच मिठी मारुन किस करुन लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:17 PM2023-04-17T17:17:18+5:302023-04-17T17:22:57+5:30
लंडनमधून आलेल्या या महिला भक्ताने बाबांना पाहताच त्यांना मिठी मारली. त्यानंतर, किस करत बाबांवरील प्रेम व्यक्त केले.
मुंबई - बागेश्वर धाम आणि बागेश्वर बाबा हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहेत. त्यातच, मुंबईत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीमद्भागवत कथेचा कार्यक्रम पार पडल्यानंतरही बाबा महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर, विदिशा येथे झालेल्या त्यांच्या एका कार्यक्रमाचा १३ एप्रिल रोजी समारोप झाला. ७ दिवसांच्या या कथेला एवढी गर्दी होती की कुठेही पाऊल ठेवायला जागा नव्हती. या गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी २२ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. एवढेच नाही तर पार्किंगमध्ये लावलेल्या १२ बाईकही गायब झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात बाबांच्या कार्यक्रमाला भक्तांनी गर्दी होती. आता, सोशल मीडियावर बाबांच्या एका फॉरेनर भक्ताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
लंडनमधून आलेल्या या महिला भक्ताने बाबांना पाहताच त्यांना मिठी मारली. त्यानंतर, किस करत बाबांवरील प्रेम व्यक्त केले. बागेश्वर बाबांच्या आजुबाजूला उपस्थित भक्तांना हा धक्का होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. बागेश्वर धाम सरकार या नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. पंडित धीरज शास्त्री आणि त्यांचे परदेशी महिला भक्ताच्या या व्हिडिओवर नेटीझन्स कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा प्रमोशनचा भाग असल्याचंही म्हटंलय.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेसाठी एवढी गर्दी होती की अनेकजण नातेवाईकांपासून दुरावले. काही वेळासाठी हरवले आणि नंतर सापडले. एका आकडेवारीनुसार, या कथेदरम्यान ५० हून अधिक लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून लांब गेले होते, सर्वसामान्यांपासून ते व्हीआयपी लोक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय खासदार रमाकांत भार्गव, विदिशा प्रभारी मंत्री विश्वास सारंग, सिद्धीच्या खासदार रिता पाठक, खासदार प्रज्ञा ठाकूर, अक्षय ऊर्जा मंत्री हरदीप सिंह डंग, आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, भोपाळच्या महापौर मालती राय आणि माजी मंत्री रामपाल सिंह. राजपूत आदींसह बडे नेते धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेत सामील झाले. त्यामुळेच, धीरेंद्र शास्त्री यांचा फोलोविंग वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान, माझ्या नावाने कोणाला काही देण्याची गरज नाही, असे आवाहन धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. ते म्हणाले. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो भक्ताची भक्ती पाहतो. विदिशा येथील कथेनंतर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, बागेश्वर धाममध्ये खूप गर्दी असते. त्यामुळेच आता दरबार धामपासून तीन ते चार किमी अंतरावर होणार आहे.