बजरंगी भाईजानच्या भेटीसाठी 'ती' पाकमधून भारतात आली
By admin | Published: July 31, 2015 09:00 PM2015-07-31T21:00:45+5:302015-07-31T21:15:40+5:30
सलमानच्या प्रेमापोटी पाकमधील एका विवाहितेने व्हिसा न घेताच थेट भारत गाठले. पण या नादात तिला आता तुरुंगाची हवा खावी लागली असून सलमानला प्रत्यक्ष बघण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - बजरंगी भाईजान अर्थात सलमान खान हा वादग्रस्त अभिनेता असला तरी त्याचे चाहते अजूनही सलमानवर भरभरुन प्रेम करतात. सलमानच्या प्रेमापोटी पाकमधील एका विवाहितेने व्हिसा न घेताच थेट भारत गाठले. पण या नादात तिला आता तुरुंगाची हवा खावी लागली असून सलमानला प्रत्यक्ष बघण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले.
पाकिस्तानमध्ये राहणारी २७ वर्षीय चंदा ही अटारी रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनमधून प्रवास करत असताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पाकिस्तानमधून आल्याचे चंदाने सांगितल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने पोलिसांना विविध कारणं सांगितली. पाकमधून मामासोबत भारतात आले मात्र माझे सर्व कागदपत्र मामाकडेच राहिले, मुलाला दिर्घायूष्य मिळावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी भारतात आले अशी कारणंही तिने देऊन बघितले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सत्य सांगितले व ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले. चंदा ही सलमानची चाहती असून त्याची एक झलक बघण्यासाठीच सीमारेषा ओलांडून भारतात आले असे तिचे म्हणणे आहे. सलमानचा बजरंगी भाईजान हा महिन्यातच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे. या चित्रपटात सलमान एका लहान मुलीला तिच्या पाकमधील घरी सोडण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकमध्ये जातो. चंदाने बहुधा याच चित्रपटातून प्रेरणा घेतली व ही बजरंगी बहन थेट भारतात आली.