तीच्या रोजच्या ३०० मिसकॉलला कंटाळून त्याने केली आत्महत्या
By Admin | Published: June 30, 2016 08:20 PM2016-06-30T20:20:10+5:302016-06-30T20:20:24+5:30
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल पाहिला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल ३५१ मिस्ड कॉल होते.
>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. ३० : प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडली आहे. हितेश नावाच्या तरुणानं प्रेयसीच्या छळाला वैतागून गळफास लावून आत्महात्या केली आहे. हितेशनं प्रेयसीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल पाहिला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल ३५१ मिस्ड कॉल होते. सहा महिन्यापूर्वीच हितेशच्या प्रेयसीने त्याच्यावर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता, ती त्याला वारंवार फोन करायची. दिवसातून एक दोनदा नव्हे तर तब्बल ३०० ते ४०० फोन त्याला करायची. असा कुटुंबीयांनी तीच्यावर आरोप केला आहे.
तिच्या या आरोपामुळे हितेशला १ महिना जेलमध्येही जावं लागलं होतं. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्यानंतर त्यानं प्रेयसीला भेटणं सोडून दिलं होती. पण त्यानंतर ती त्याला अधिकच छळू लागली. पोलिसांनी हितेशचा फोन ताब्यात घेतला असून ते यासंबंधी अधिक चौकशी करीत आहेत.