अखेर १६ वर्षापासूनचे उपोषण 'तिने' सोडले

By admin | Published: August 9, 2016 04:33 PM2016-08-09T16:33:41+5:302016-08-09T16:44:07+5:30

मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी अखेर मंगळवारी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडले.

She finally left the 'fasting' fast since the age of 16 | अखेर १६ वर्षापासूनचे उपोषण 'तिने' सोडले

अखेर १६ वर्षापासूनचे उपोषण 'तिने' सोडले

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी अखेर मंगळवारी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडले. उपोषण सोडताना त्यांना रडू कोसळले. मणिपूरमध्ये लष्कराला विशेष अधिकार देणारा (AFSPA) कायदा रद्द करावा या मागणीसाठी शर्मिला मागच्या १६ वर्षांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या.  
 
येत्या नऊ ऑगस्टला उपोषण सोडण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी उपोषण सोडले. मणिपूरमध्ये लष्कर विशेष अधिकार कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता. मणीपूरची मुख्यमंत्री बनून मला जनतेची सेवा करायची आहे असे उपोषण सोडल्यानंतर इरॉमने सांगितले. 
 
मी मणीपूरची मुख्यमंत्री झाले तर, सर्वप्रथम मी लष्कराला विशेष अधिकार देणारा (AFSPA) कायदा रद्द करण्याचे काम करीन असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कुठल्याही प्रस्थापित पक्षाबरोबर आपण जाणार नाही असेही इरॉमने स्पष्ट केले. इरॉमला साल २००० पासून जबरदस्तीने नासाल ट्युबमधून जेवण दिले जात होते. 
 
अटकेत असल्यामुळे इंम्फाळच्या स्थानिक कोर्टाने त्यांना आज सकाळी जामिन मंजूर केला. इरॉमला काही कट्टरपंथीय संघटनांनी धमकी दिल्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. 
 
माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करण्याऐवजी मी आता निवडणूक लढवून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करीन असे इरॉम शर्मिला यांनी सांगितले होते. इरॉम नोव्हेंबर २००० पासून उपोषणाला बसल्या होत्या. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर  एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. 
 

Web Title: She finally left the 'fasting' fast since the age of 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.