सिंहांच्या कळपात तिने दिला बाळाला जन्म
By admin | Published: July 1, 2017 11:38 AM2017-07-01T11:38:14+5:302017-07-01T16:01:28+5:30
लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 1- स्त्री गरोदर असताना प्रसुतीचे दिवस जवळ आले की बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा क्वचित रेल्वे ट्रेनमध्ये महिलेचे प्रसुती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण सगळ्यानांचा आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना राजकोटमध्ये घडली आहे. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. त्या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली होती. नंतर तिला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलन्सला सिंहाच्या कळपाने घेरलं. त्या सिंहाच्या कळपात 11-12 सिंह होते.
108 क्रमांकाच्या इमरजन्सी अॅम्ब्युलन्स सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितलं, आम्ही गाडीला थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्त्राव व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात यश मिळवलं.
महिलेची अॅम्ब्युलन्समध्ये प्रसुती सुरू असताना समोर असलेले सिंह पूर्णवेळ गाडीभोवती फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने अॅम्ब्युलन्स हळूहळू पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहसुद्धा रस्त्यावरून बाजूला गेले. काही मिनिटातच ते सिंह रस्त्यापासून लांब गेले. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा :
पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी
खरंतर 108 क्रमांकावर इमरजन्सी सेवा देत असताना याआधीही अॅम्ब्युलन्सा सिंहाच्या कळपाला सामोरं जावं लागलं होतं. अमरेली गावात नेहमीच सिंह दिसत असतात. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा रस्ते नीट नसल्याने अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांना चालतसुद्धा जावं लागतं, असं गढिया यांनी सांगितलं आहे.