लाखोच्या पॅकेजची नोकरी सोडून 'महाकुंभ'ला पोहचली; एअर होस्टेसला का बनायचंय साध्वी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:21 IST2025-01-28T12:01:17+5:302025-01-28T12:21:19+5:30
याआधी महाकुंभ मेळ्यातून हर्षा रिछारिया नावाची तरुणी व्हायरल झाली होती. तिचं सौंदर्य पाहून अनेकांनी ती सुंदर साध्वी असल्याचं म्हटलं.

लाखोच्या पॅकेजची नोकरी सोडून 'महाकुंभ'ला पोहचली; एअर होस्टेसला का बनायचंय साध्वी?
प्रयागराज - महाकुंभ मेळा २०२५ यूट्यूबर्स आणि रिल्स बनवणाऱ्यांसाठी संगमसारखा आहे. प्रयागराज महाकुंभमधून रोज कुठला ना कुठला व्हिडिओ आणि Reel समोर येतात आणि तेच व्हायरल होऊन चर्चेत राहतात. कुणी चहा विकून, पाणी विकून, भेळ विकून लाखो कमाई करतंय तर कुणी लाखोंची मोहमाया सोडून सन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त करतंय. महाकुंभ मेळ्यातून आणखी एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एका एअर होस्टेसला सर्वकाही सोडून साध्वी बनायचं आहे.
इन्स्टाग्रामवर एका युजरने व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एका मुलीला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला लाखो रुपयाची नोकरी सोडून साध्वी का बनायचं आहे, त्यावर मुलीने दिलखुलास उत्तर दिले. एअर होस्टेस म्हणून भलेही मी लाखोची नोकरी करत असेल, मुलीचं ते पॅशन असते परंतु जेव्हा तुमच्या मनाचं समाधान होत नाही, धार्मिक गोष्टीतून मानसिक शांती मिळत असेल तर त्यातून आनंद घेण्यासाठी त्या दिशेने पुढे जायला हवं असं तिने उत्तर दिले.
या व्हायरल व्हिडिओवरून अनेक कमेंट्स येत आहेत. ज्यात लोक आता फेमस होण्यासाठी हे सर्व सोशल मीडियावर करत आहेत असं म्हणतात. तर दुसऱ्याने हर्षा रिछारियासारखे हिलाही प्रसिद्धीझोतात यायचं आहे असं म्हटलं. याआधी महाकुंभ मेळ्यातून हर्षा रिछारिया नावाची तरुणी व्हायरल झाली होती. तिचं सौंदर्य पाहून अनेकांनी ती सुंदर साध्वी असल्याचं म्हटलं. ३१ वर्षीय हर्षा रिछारिया उत्तराखंडहून येते. तिचं मूळ घर भोपाळमध्ये आहे. निरंजीन आखाड्याशी ती जोडलेली आहे.
दरम्यान, मी लवकरच दीक्षा घेणार असून मला अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर मी साध्वी बनेन. माझ्या आईचं सहा महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही जितकं धार्मिक असाल, देवावर श्रद्धा ठेवाल तितकं तुम्हाला मानसिक सुख जास्त मिळेल असं मला वाटते. मी एम कॉम केले त्यानंतर एअर होस्टेस बनली. आयुष्यात तुमचं जे दु:ख आहे ते लोकांना सांगितले तर ते कमी होत नाही, आणखी वाढते. त्यामुळे तुम्ही देवाचा नामजप करत राहा असं एअर होस्टेस डिझा शर्मा यांनी सांगितले.