गर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी "त्या"ने घातलं थेट मोदींना साकडं
By admin | Published: May 7, 2017 11:57 AM2017-05-07T11:57:52+5:302017-05-07T12:07:05+5:30
चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 7 - चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे. दोघांच्या पालकांची मनधरणी करण्यासाठी स्वयंसेवक पाठवावेत अशीही विनंती या तरूणाने मोदींना केली आहे. प्रेयसीशी लग्न जुळवून द्यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घालणारं पत्र त्याने पंतप्रदान कार्यालयाला पाठवलं आहे.
अशाप्रकारची अनेक गमतीशीर पत्रे चंदीगड येथून पंतप्रधानांच्या कार्यालयात येत असतात. सेंट्रलाइज्ड जनतक्रान निवारण आणि देखरेख यंत्रणेच्या माध्यमातून येणारे 60 टक्के पत्रं गमतीशीर असतात आणि त्यामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गमतीशीर मागण्या केलेल्या असतात. पंतप्रधान कार्यालयाकडे चंदीगडहून दर महिन्याला 400 तक्रारी जातात, यापैकी अनेक तक्रारी वैयक्तिक समस्यांच्या बाबतीत असतात असं येथील एका अधिकाऱ्यांने सांगितलं. प्रेसरिडरने याबाबत वृत्त दिलं आहे.
असाच एका पत्रात एका रहिवाशाने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून चंदीगड पोलिसांना हेलिकॉप्टर सुविधा पुरवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे तरी पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचतील असं त्यांचं म्हणणं होतं. तर आणखी एका पत्रात, कोणी व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय रोज घरासमोरून झाडाची फुलं तोडून नेतो पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही अशी तक्रार केली आहे.