...तिने 18 महिन्यांच्या बाळासोबत घेतली पोलीस ट्रेनिंग

By Admin | Published: April 3, 2017 04:28 PM2017-04-03T16:28:20+5:302017-04-03T16:50:05+5:30

गुजरातमध्ये एका महिलेने आपल्या 18 महिन्याच्या बाळासोबत पोलीस ट्रेनिंग पुर्ण केलं

... she took with the 18-month-old baby police training | ...तिने 18 महिन्यांच्या बाळासोबत घेतली पोलीस ट्रेनिंग

...तिने 18 महिन्यांच्या बाळासोबत घेतली पोलीस ट्रेनिंग

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 3 - पोलीस ट्रेनिंग म्हटलं की अनेकांची दमछाक होते. कित्येक उमेदवार पोलीस भरती तर होतात, मात्र कडक शिस्तीतं होणारं ते ट्रेनिंग पाहून अर्ध्यातूनच पळ काढतात. पण गुजरातमध्ये एका महिलेने आपल्या 18 महिन्याच्या मुलासोबत पोलीस ट्रेनिंग पुर्ण केलं. इतकंच नाही तर आता गुजरात पोलीस अकादमीतून ग्रॅज्यूएट होणा-या 421 पोलीस उपनिरीक्षकांपैकी ती एक आहे. 270 पुरुष आणि 151 महिलांची एक बॅच यावेळी गुजरात पोलीस अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होणार आहे. 
 
मित्तल पटेल असं या महिलेचं नाव आहे. मित्तल आपल्या 18 महिन्यांच्या बाळाला घेऊन पोलीस ट्रेनिंगमध्ये सहभागी झाली होती. गुजरात पोलीस अकादमीच्या सहसंचालकर निपुणा तोरावेन यांनी सांगितलं आहे की, "मित्तलने आपलं प्रशिक्षण पुर्ण केलं आहे. 421 उमेदवारांमध्ये तिने 36 वा क्रमांक मिळवला आहे. मित्तलच्या या विशेष मेहनतीसाठी डायरेक्टर्स ट्रॉफी देऊन तिचा सन्मान केला जाणार आहे". 
 
"एखाद्या महिला उमेदवाराने आपल्या लहान मुलासोबत प्रशिक्षण पुर्ण करण्याची ही पहिलीच घटना आहे. आम्ही मित्तलसाठी कॅम्पसमध्ये खास सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या", असं निपुणा तोरावेन बोलल्य आहेत.
 

Web Title: ... she took with the 18-month-old baby police training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.