घरी पाहुणी म्हणून आली होती; ईलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली, लोकांनी तिला सोडून सर्वांना बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:39 IST2025-01-05T12:38:48+5:302025-01-05T12:39:23+5:30
पाहुणी असल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ही मुलगी लक्षात आली नाही. रविवारी सकाळी ती बडोद्याला परत जाणार होती. परंतू त्याच्या रात्रीच तिच्यावर काळाचा घाला पडला.

घरी पाहुणी म्हणून आली होती; ईलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली, लोकांनी तिला सोडून सर्वांना बाहेर काढले
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. चार्जिंगला लावण्यात आलेल्या स्कूटरला आग लागली. यामध्ये ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून अन्य दोन जखमी झाले आहेत. ईलेक्ट्रीक स्कूटरच्या बाजुला असलेली अॅक्टिव्हा देखील जळून खाक झाली आहे.
लक्ष्मणपूरच्या पीएनटी कॉलनीमध्ये दीपक किराना यांच्या घरी भगवती मौर्य व तिचे कुटुंबीय पाहुणे म्हणून आले होते. किराणा यांनी त्यांची स्कूटर चार्जिंगला लावली होती. रात्री चार्जिंग पूर्ण झाल्यावर त्यातून आग निघू लागली. यामध्ये शेजारी उभी करण्यात आलेली अॅक्टिव्हा देखील जळाली.
धुर पसरताच घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले, परंतू ११ वर्षांची मुलगी आतच राहिली. घरात धूर कोंडल्याने तिचा श्वास कोंडला व मृत्यू झाला. फायर ब्रिगेडला बोलविण्यात आले व आग विझविण्यात आली. यानंतर लगेचच मुलीला घरातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. हॉस्पिटलमध्ये तिला मृत घोषित करण्यात आले.
पाहुणी असल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ही मुलगी लक्षात आली नाही. रविवारी सकाळी ती बडोद्याला परत जाणार होती. परंतू त्याच्या रात्रीच तिच्यावर काळाचा घाला पडला.