स्वतःशीच करणार ‘ती’ लग्न; सात फेरे, सिंदूर अन् हनिमूनही...; असा निर्णय का घेतला, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:51 AM2022-06-03T06:51:40+5:302022-06-03T06:51:52+5:30

क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहे. यासाठी तिने लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे.

She will marry herself; Seven rounds, vermilion and honeymoon too; Find out why | स्वतःशीच करणार ‘ती’ लग्न; सात फेरे, सिंदूर अन् हनिमूनही...; असा निर्णय का घेतला, जाणून घ्या

स्वतःशीच करणार ‘ती’ लग्न; सात फेरे, सिंदूर अन् हनिमूनही...; असा निर्णय का घेतला, जाणून घ्या

Next

वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथे राहणाऱ्या क्षमा बिंदूचे ११ जूनला लग्न आहे; विशेष लग्नासाठी कोणतीही वरात येणार नाही, नवरदेवही नाहीये. वराशिवाय लग्न? हे वाचून आश्चर्य वाटलं असेल; पण हे खरंय. २४ वर्षीय क्षमा बिंदू दुसऱ्या कोणाशीही नाही तर चक्क स्वतःशीच लग्न करणार आहे.

क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहे. यासाठी तिने लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. स्वतःशीच लग्न करणार असली तरी या लग्नाची खास गोष्ट म्हणजे सर्व रितीरिवाजांसह हे लग्न पार पडणार आहे. अगदी सात फेरे घेण्यापासून ते सिंदूर लावण्यापर्यंत. 

असा निर्णय नेमका का घेतला? 

लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती; पण वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळे स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत काम करते. ‘स्वयं-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक त्यांचे ज्यांच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे व म्हणून मी स्वतःशीच लग्न करतेय.’

हनिमूनसाठी गोव्याला!

आई-वडील खुल्या विचारांचे आहेत. या निर्णयास त्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी यासाठी आशीर्वाद दिला. लग्नानंतर ती हनिमूनलाही जाणार आहे. गोत्रीच्या मंदिरातील विवाहासाठी तिने पाच नवसही लिहिले आहेत. क्षमा हनिमूनसाठी जवळपास दोन आठवडे गोव्यात असेल.  देशात ‘सोलो लग्न’ करणारी ती पहिलीच मुलगी असावी, असेही तिने सांगितले.

Web Title: She will marry herself; Seven rounds, vermilion and honeymoon too; Find out why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.