काश्मिरात प्राणघातक शस्त्रे होणार ‘म्यान’!

By admin | Published: September 4, 2016 03:46 AM2016-09-04T03:46:33+5:302016-09-04T03:46:33+5:30

काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या, रविवारी तिथे जात असून, त्याआधी शनिवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खोऱ्यात पेलेट गन्स वापरण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले.

'Sheath' will be the deadly weapons in Kashmir | काश्मिरात प्राणघातक शस्त्रे होणार ‘म्यान’!

काश्मिरात प्राणघातक शस्त्रे होणार ‘म्यान’!

Next

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या, रविवारी तिथे जात असून, त्याआधी शनिवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खोऱ्यात पेलेट गन्स वापरण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. पेलेट गन्समुळे खोऱ्यातील अनेकांच्या डोळ्यांना, शरीराला गंभीर इजा झाली असून, काही जण छर्रे शरीरात शिरल्याने मरणही पावले. त्यामुळे पेलेट्सचा वापर थांबवा, अशी मागणी सातत्याने होत होती.
यापुढे काळी मिरीची पूड वापरून तयार केलेल्या पावा शेल्स वापरण्यात येतील. त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळ्यांची आग होणे, शरीराची काही काळ आग होणे असा त्रास होतो. पण मोठी इजा होत नाही. त्याआधी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही पेलेट्सचा वापर थांबवण्याची मागणी झाली. तसेच तिढा सोडवण्यासाठी फुटीरवादी गट आणि हुर्रियतशीही चर्चा व्हावी, असे मत सीताराम येचुरी यांच्यासह काही नेत्यांनी व्यक्त केले.

३0 नेत्यांचे शिष्टमंडळ आज श्रीनगरमध्ये दाखल
काश्मीरमधील सर्व पक्ष, गट तसेच फुटीरवादी नेत्यांचे म्हणणे सरकारने आणि सर्वांनी ऐकून घ्यायलाच हवे, अशी मागणी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही केली आहे.
उद्या ३0 नेत्यांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये कन्व्हेंशन सेंटरमध्ये राहणार असून, तिथेच दोन दिवस संबंधित मंडळींशी चर्चा करेल. तेथील परिस्थिती पाहता, ते रुग्णालयांतही जाणार नाही.
या नेत्यांनी हुर्रियतशी चर्चेवर जोर दिला असला तरी हुर्रियतचे नेते गिलानी यांनी शिष्टमंडळाला कोणीही भेटू, असे म्हटले आहे.
या नेत्यांना काश्मीरचा प्रश्न नेमका काय आहे, हे समजलेलेच नाही, अशी टीका गिलानींनी केली आहे.

ताठर भूमिक ा नको; प्रश्न अधिकच बिकट बनेल
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझाद व मल्लिकार्जुन खरगे यांनी आजच्या बैठकीत बोलताना काश्मीरच्या प्रत्येक घटकाशी चर्चा करण्याची गरज आहे.
येचुरी म्हणाले की, हुर्रियतशी बोलणार नाही, अमूक नेत्यांशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका केंद्राने सोडायला हवी. अशा ताठर भूमिकेमुळे काश्मीरचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट बनेल.
अकाली दलाचे प्रेमसिंग चंदुमांजरा
म्हणाले की, गेले ५७ दिवस चाललेल्या हिंसाचारामुळे काश्मीरचा धर्मनिरपेक्ष चेहरा नष्ट झाला असून, ही चिंतेची बाब आहे. या शिष्टमंडळात पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग, काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचाही समावेश आहे.

Web Title: 'Sheath' will be the deadly weapons in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.