शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जींच्या सीबीआय कोठडीत तीन दिवसांची वाढ
By admin | Published: November 23, 2015 05:20 PM2015-11-23T17:20:28+5:302015-11-23T17:24:14+5:30
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआय कोठडी तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआय कोठडी तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. शीना बोरा हत्याकांडामध्ये आर्थिक हितसंबंध असून त्या दिशेने तापस करण्यासाठी पीटर यांची आणखी चौकशी करावी लागेल हा सीबीआयचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आहे.
पीटर मुखर्जी यांनी आपले शीनाशी बोलणे झाल्याचा दावा मुलगा राहूल याच्याकडे केला होता. नंतर असे निष्पन्न झाले की त्याआधीच शीनाचा खून झाला होता. त्यामुळे पीटरना शीनाच्या हत्येची कल्पना होती असा दावा करत सीबीआयने पीटर यांची कोठडी मागितली होती, जी न्यायालयाने मान्य केली. आता राहूल यांनी आपले वडील निर्दोष असल्याचा दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय सध्या शीनाच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.
अत्यंत उच्चभ्रू अशा या खूनप्रकरणामध्ये आता पीटर यांच्या जबानीनंतर आणखी काय बाहेर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.