शीना बोरा हत्या- जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:29+5:302015-09-04T22:45:29+5:30

पीटरसोबतच्या वादानंतर बनावट ई-मेल

Sheena Bora murder- Joint | शीना बोरा हत्या- जोड

शीना बोरा हत्या- जोड

googlenewsNext
टरसोबतच्या वादानंतर बनावट ई-मेल
शीना गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जीने वडील पीटर यांच्यासमोर इंद्राणीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पीटर आणि इंद्राणी यांच्यात शीनाच्या विषयावरून वरचेवर खटके उडू लागले, वाद होऊ लागले. त्यानंतरच इंद्राणीने शीनाच्या नावे बनावट ई-मेल अकाऊन्ट तयार करण्याची शक्कल लढवली. तिने शीनाच्या नावे ज्यांना ई-मेल पाठवले, त्या प्रत्येकाला शीनाच आपल्याशी संवाद साधते, असे वाटत होते. पीटरनाही असेच वाटले व त्यांची खात्री पटली की शीना अमेरिकेत आहे. राहुल हा पीटर व त्यांची पहिली पत्नी शबनम यांचा मुलगा. शीना व राहुल यांच्यात प्रेमसंबंध होते. तसेच त्यांचा साखरपुडाही झाला होता. इंद्राणीने राहुलला मात्र ई-मेल पाठवले नव्हते. कारण ती शीनाच्या मोबाईलवरून त्याला मेसेज पाठवत होती.
---
इंग्रजी समजणार्‍या अधिकार्‍यांसमोर वकीलाची भेट
एकांतात इंद्राणीची भेट घेता यावी, अशी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. इंद्राणीची भेट पोलिसांसमक्ष घ्यावी, असे आदेश दिले. त्यानंतर ॲड. महेश जेठमलानी यांच्या सहकारी ॲड. मंगला यांनी इंद्राणीची भेट घेतली. मात्र या भेटींमध्ये वकील व इंद्राणी इंग्रजीतून संवाद साधतात हे लक्षात येताच पोलिसांनी या भेटीच्या वेळी इंग्रजी समजणार्‍या अधिकार्‍यांची ड्युटी लावल्याचे समजते.
-----
मारियांच्या बदलीपूर्वी तपास पूर्ण करणार
बहुचर्चित आणि अत्यंत गुंतागुंत असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार खार पोलिसांनी केला आहे. कारण ३० सप्टेंबरनंतर मारिया यांची बढती होणार असून त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी अन्य अधिकार्‍याच्या खांद्यावर येणार आहे.
-------
गुन्हा सिद्ध होणारच
शीना बोरा हत्याकांडाच्या तपासात भक्कम पुरावे हाती आले असून त्याआधारे आरोपी इंद्राणी, संजीव व श्याम यांनीच शीनाची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध करू, असा विश्वास खार पोलीस व्यक्त करत आहेत.
------
पीटर यांना क्लीनचिट नाही
इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांची खार पोलिसांनी शुक्रवारीही चौकशी केली. गेले तीन दिवस पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र तिसर्‍या दिवसाच्या चौकशीनंतरही पोलिसांनी त्यांना क्लीनचिट दिलेली नाही. त्यांच्यावरील संशयाची सुई अद्यापही पुढे सरकलेली नाही, असे समजते.
-------
मिखाईलला दर महिना ४० हजार
आपल्या आई-वडलांच्या देखभालीसाठी इंद्राणी मिखाईलला दरमहा ४० हजार रुपये देत असे. इंद्राणीकडून होत असलेल्या आर्थिक मदतीवर तो पूर्णपणे अवलंबून होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
------
महिन्याभरापासून मुखर्जी दाम्पत्याच्या
मालमत्तेची चौकशी
महिन्याभरापासून मुंबई पोलिसांकडून पीटर व इंद्राणी मुखर्जी, शीना बोरा आणि तिचा सख्खा भाऊ मिखाईल यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची सखोल चौकशी मुंबई पोलीस करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी चार्टर्ड अकाऊन्टन्टची मदत घेतली आहे. सीएकडून फॉरेन्सिक ऑडिट सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने लोकमतला सांगितले.
---------
विधी खन्नाची चौकशी
आरोपी संजीव खन्ना याची कन्या विधी हिची खार पोलिसांनी शुक्रवारी कसून चौकशी केली. विधी संजीव व इंद्राणी यांची कन्या असली तरी पीटर मुखर्जी यांनी तिला दत्तक घेतले होते.
------------
आज रिमांड
इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपणार आहे. त्यामुळे पोलीस त्यांना पुढील रिमांडसाठी वांद्रे न्यायालयात हजर करतील.

Web Title: Sheena Bora murder- Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.