बांगलादेशच्या पंतप्रधानांची 'लेक' WHO मध्ये निवडणुकीच्या रिंगणात; G20 मध्ये आईसोबत मोदींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:36 PM2023-09-09T15:36:31+5:302023-09-09T15:45:00+5:30

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही G20 परिषदेत सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेसाठी शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजेदही भारतात आल्या आहेत.

sheikh hasina daughter contesting elections who met pm modi with her mother g20 platform saima wazed | बांगलादेशच्या पंतप्रधानांची 'लेक' WHO मध्ये निवडणुकीच्या रिंगणात; G20 मध्ये आईसोबत मोदींची घेतली भेट

बांगलादेशच्या पंतप्रधानांची 'लेक' WHO मध्ये निवडणुकीच्या रिंगणात; G20 मध्ये आईसोबत मोदींची घेतली भेट

googlenewsNext

दिल्लीत मोठ्या उत्साहात G20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. जगभरातील राष्ट्रपती, पंतप्रधान दिल्लीत दाखल झाले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही G20 परिषदेत सहभागी झाल्या आहेत. या शिखर परिषदेसाठी शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजेदही भारतात आल्या आहेत. भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या WHO च्या प्रादेशिक संचालक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक भारतात होणार आहे. वाजेद हे आसियान शिखर परिषदेसाठी इंडोनेशियालाही गेल्या होत्या. सायमा वाजेद सध्या चर्चेत आहेत.

“भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय जोडले गेले”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

अलीकडेच त्या बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासोबत इंडोनेशियामध्ये झालेल्या आसियान शिखर परिषदेसाठी गेल्या होत्या. आठवडाभरातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात वाझेद यांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण आले आहे. वेळ आल्यावर त्यांना सत्ताधारी अवामी लीगमध्ये मोठी राजकीय भूमिका दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

भारताच्या अधिकृत दौऱ्यात शेख हसीना यांची मुलगी त्यांच्या आईसोबत येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. सायमाने ट्विटरवर लिहिले की, नवी दिल्लीत जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट खूप चांगली होती.

सायमा वाजेद दक्षिण-पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक संचालकपदासाठी निवडणूक लढवत आहेत. युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीनुसार, नेपाळने नामनिर्देशित केलेले डॉ. शंभू प्रसाद आचार्य हे दुसरे उमेदवार आहेत. सायमा वाजेद यांनीही उमेदवारी जाहीर केली होती. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, WHO दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाच्या संचालकपदासाठी ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत नवी दिल्ली येथे निवडणूक होणार आहे. यामध्ये ११ सदस्य देश मतदान करणार आहेत. मतदान करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेश, भूतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि तिमोर-लेस्टे यांचा समावेश आहे.

Web Title: sheikh hasina daughter contesting elections who met pm modi with her mother g20 platform saima wazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.