शीला दीक्षितांना नको मुख्यमंत्रिपद
By Admin | Published: June 28, 2016 05:58 AM2016-06-28T05:58:38+5:302016-06-28T05:58:38+5:30
काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रस्ताव दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी फेटाळला असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रस्ताव दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी फेटाळला असल्याची माहिती आहे.
गेल्या १६ जून रोजी दीक्षित यांनी सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यापासून उत्तर प्रदेश निवडणुकीत त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार राहणार, या चर्चेला उधाण आले होते.
अलीकडेच दिल्लीतील पाणी टँकर घोटाळ्यात शीला दीक्षित यांचे नाव गोवले गेले असून, आम आदमी पार्टीने त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लावला आहे. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला असून, शीला दीक्षित यांना चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)