अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष शेखर बसू

By Admin | Published: October 10, 2015 05:52 AM2015-10-10T05:52:12+5:302015-10-10T05:52:12+5:30

भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची शुक्रवारी केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Shekhar Basu, the new chairman of the Atomic Energy Commission | अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष शेखर बसू

अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष शेखर बसू

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची शुक्रवारी केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या पदावर अवघ्या ११ महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे. डॉ. बसू सध्या भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) संचालक असून, अणू पुनर्वापर मंडळाचे (एनआरबी) मुख्य कार्यकारी आहेत. सध्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख असलेले डॉ. आर.के. सिन्हा
२३ आॅक्टोबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्याकडून बसू सूत्रे हाती घेतील. कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन पुन:प्रक्रिया सुविधा प्रकल्प स्थापन करण्यात डॉ. बसूंची मुख्य भूमिका आहे.

Web Title: Shekhar Basu, the new chairman of the Atomic Energy Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.