शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:18 AM2020-08-22T11:18:42+5:302020-08-22T11:34:22+5:30
शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो)चे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांना आणि त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून मुख्यमंत्री आणि सोरेन यांचे पूत्र हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा सोमवारी कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. दोघांचीही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. शिबू सोरेन यांचे वय 74 वर्षे असल्याने राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे.
शिबू सोरेन आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची निवासस्थाने वेगवेगळी आहेत. मात्र, तरीही सावधगिरी म्हणून हेमंत सोरेन यांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. पहिली टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, पुन्हा 24 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
याआधी झारखंडचे कॅबिनेट मंत्री बन्ना गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीला गुप्ता यांनी हजेरी लावली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, अधिकारी हजर होते. बन्ना गुप्ता यांना कोरोना झाल्याने मंत्रिमंडळाचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य
वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द
Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड
युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप