8600 किमी, 370 दिवसांचा पायी प्रवास करून केरळच्या शिहाबने गाठले मक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 02:58 PM2023-06-10T14:58:11+5:302023-06-10T14:58:56+5:30

एका वर्षात पाच दिवस म्हणजे (सुमारे 370 दिवस) त्याने प्रवास पूर्ण करून मक्का गाठले.

shihab chottur from kerala reached mecca here you read all about information | 8600 किमी, 370 दिवसांचा पायी प्रवास करून केरळच्या शिहाबने गाठले मक्का!

8600 किमी, 370 दिवसांचा पायी प्रवास करून केरळच्या शिहाबने गाठले मक्का!

googlenewsNext

सध्या लोक हज यात्रेला निघाले आहेत. या धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतातून जवळपास 175000 लोक मक्का येथे पोहोचणार आहेत 21 मे पासून हा प्रवास सुरू झाला आहे. केरळमधील शिहाब छोटूर या तरुणाने मक्काला पायी जाण्याचा निर्णय घेतला. हा खूप कठीण निर्णय होता. कारण भारतापासून मक्का हे अंतर 8640 किलोमीटर होते. 

एका वर्षात पाच दिवस म्हणजे (सुमारे 370 दिवस) त्याने प्रवास पूर्ण करून मक्का गाठले. पाकिस्तान, इराण, इराक, कुवेतमार्गे तो सौदी अरेबियात पोहोचला. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वलनचेरी येथील रहिवासी शिहाब छोत्तूर हा मक्का येथे जाण्यासाठी 2 जून 2022 रोजी घरातून निघाला. यानंतर प्रवासात अनेक थांबे घेत तो याच महिन्यात मक्का येथे पोहोचला. सौदीला पोहोचल्यानंतर शिहाबने इस्लामचे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मदिना गाठले. येथे त्याने 21 दिवस घालवले. 

शिहाबने नऊ दिवसांत मक्का आणि मदिना दरम्यानचे 440 किलोमीटरचे अंतर कापले. पाकिस्तानने धार्मिक यात्रेतही अडथळे निर्माण केले. ट्रान्झिट व्हिसाच्या नावाखाली शिहाबला एका शाळेत ठेवले होते. शिहाब आपली आई झैनाबा सौदीला पोहोचल्यानंतर हज करणार आहे. दरम्यान, केरळचा शिहाब स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवतो. दररोज तो आपला प्रवासही प्रेक्षकांना सांगत गेला. 

गेल्या वर्षी जूनमध्ये हज यात्रा सुरू केल्यानंतर, शिहाब वाघा सीमेवर पोहोचण्यापूर्वी देशातील अनेक राज्यांमधून गेला. वाघा बॉर्डरवरून त्याला पाकिस्तानात प्रवेश करायचा होता, पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. कारण शिहाबकडे व्हिसा नव्हता. शिहाबला ट्रान्झिट व्हिसा मिळण्यासाठी महिनाभर शाळेत थांबावे लागले. फेब्रुवारी 2023 मध्ये शिहाबला ट्रान्झिट व्हिसा मिळाला. यानंतर त्याने पुन्हा प्रवास सुरू केला आणि चार महिन्यांनी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचला.

Web Title: shihab chottur from kerala reached mecca here you read all about information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.