शिंदेवाडीत निवडणुकीवर बहिष्कार
By admin | Published: February 15, 2017 07:08 PM2017-02-15T19:08:51+5:302017-02-15T19:08:51+5:30
शिरगाव : स्वातंत्र्याची ७० वर्षे गावात धड रस्ता, पाणी, वीज व अन्य सुविधा नसल्या कारणाने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिंदेवाडी (ता. राधानगरी) येथील कार्यकर्ते अशोक जाधव यांनी दिला आहे.
Next
श रगाव : स्वातंत्र्याची ७० वर्षे गावात धड रस्ता, पाणी, वीज व अन्य सुविधा नसल्या कारणाने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिंदेवाडी (ता. राधानगरी) येथील कार्यकर्ते अशोक जाधव यांनी दिला आहे.धामोड खोर्यातील केळोशी पैकी शिंदेवाडी या गावची लोकसंख्या जेमतेम ४०० ते ५०० च्या आसपास आहे. या वाडीला जायला धड रस्ता नाही, पाणी नाही, विजेचे खांब मोडलेले आहेत. अशा अवस्थेत ही वाडी अनेक उन्हाळे, पावसाळे जीव मुठीत घेऊन दिवस काढीत आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी येथे येणारा उमेदवार हा वाडीच्या समस्या सोडविण्यासाठी आपणच प्रयत्न करणार असल्याचे सांगत असतो.परंतु, अद्याप काही येथील समस्या सुटलेल्या नहीत. म्हणून गावकर्यांनी या निवडणुकीवर बहिष्कारच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येथील ३०० ते ६०० मतदार असून, शिंदेवाडीकरांच्या या निर्णयाने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.