लॉकडाऊनमध्येही ४४० व्होल्टचा करंट, दोन महिने बंद हॉटेलचे बील तब्बल एवढे लाख....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:49 PM2020-05-21T17:49:09+5:302020-05-21T17:51:11+5:30
तर काही ठिकाणी यावेळी महावितरणने आपल्या ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप व्दारे घरबसल्या रिडींग सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
ग्राहकही महिन्याच्या महिन्याला वीज बील भरत असतो. लॉकडाऊनमध्ये आता वीजेचा वापरही तसा कमीच झाला आहे. घरात लागणारी वीज सोडली तर उद्योगधंंद्यांसाठी वापरण्यात येणारी वीज खर्चच झाली नाही. दोन महिन्यांपासून सर्वच कारखाने, हॉटेल बंद असल्यामुळे वीजेचा वापर जास्त प्रमाणात झाला नसला तरी एका हॉटेल मालकाला महावितरणाकडून चक्क दीड लाख रू इतके बिल आकारण्यात आले आहे.
शिमलामधील समरहिल येथील हे हॉटेल गेले दोन महिने बंदच होते.विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यातील 12 लाख ग्राहकांना अशीच बिलं दिली गेली आहेत, तर अद्याप 10 लाखांहून अधिक ग्राहकांना बिलं देण्यात आलेली नाहीत. राज्यात कर्फ्यूमुळे बोर्ड कर्मचार्यांना मीटर रीडिंगसाठी घरोघरी जाता आले नाही त्यामुळे सरासरी बिल दिले गेले आहे.महावितरणाकडे आतापर्यंत वाढीव बिल आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी होत आहे. महावितरणचा महाप्रताप समोर येताच यावर योग्य तपासणीनंतर बिलं पुन्हा ग्राहकांना देण्यात येतील त्यामुळे ग्राहकांनी संयम दाखवत नवीन बिलाची प्रतिक्षा करावी असे सांगण्यात आले आहे.
तर काही ठिकाणी यावेळी महावितरणने आपल्या ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप व्दारे घरबसल्या रिडींग सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांनी रिडींग सबमिट केले त्यांना रिडींगनुसार तर इतरांचे सरासरी युनिटने वीज देयक तयार होईल. आपले वीज देयक आपण महावितरण मोबाईल अँपमध्ये बघू शकतो तसेच भरू शकतो याद्वारे आपल्याला बिल घेता येईल आणि रक्कम अदा करता येईल.