Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 05:50 PM2018-05-31T17:50:46+5:302018-05-31T17:50:46+5:30

हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.

Shimla Water Crisis: Tourists should not come to Shimla, appeasement of locals | Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन

Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन

Next

शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.
येथील स्थानिक नागरिक पर्यटकांना न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी जावे, कारण याठिकाणी पाण्याचा फारच तुटवडा आहे. अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.




एका व्यक्तीने पर्यटकांना आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिमल्यात आम्हाला पाणी नाही. त्यामुळे कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी. याचबरोबर, सरकारने नियमावली जारी करुन शिमल्यामध्ये न येण्यास सांगायला पाहिजे. येथील स्थानिकांना पाणी मिळत नाही, अशा परिस्थितीत येथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये, असे एकाने म्हटले आहे. 

Web Title: Shimla Water Crisis: Tourists should not come to Shimla, appeasement of locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.