शिरसाने आजपासून बालसंस्कार शिबिर
By admin | Published: May 3, 2015 02:02 AM2015-05-03T02:02:41+5:302015-05-03T02:02:41+5:30
शिरसाने : शिरसाने (ता. चांदवड) येथील वारकरी अध्यात्मिक ज्ञान बालसंस्कार शिबिरास रविवारपासून ( दि. ३) प्रारंभ होत आहे. बालसंस्कार शिबिर हे रविवार ते शनिवार या कालावधीत होणार आहे. यावेळी शिबिरार्थींना श्रीमद् भागवत गीता अध्याय १२ व १५ योगासने, व्यायाम, हरिपाठ व पावल्या, निवडक अभंग, गायन, मृदुंग, टाळ व वारकरी भजन चाली, संस्कृत भाषण, गंडे रक्षणाचे महत्त्व, संत विचार, स्वावलंबन, देशप्रेम, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव व संस्कार आदि विषयांवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख व मार्गदर्शक म्हणून मधुकर महाराज जाधव, भरत महाराज पानसरे, महेश उफाडे, सागर बोरगुडे, भानुदास भुल्यानेकर, महेश काटे उपस्थित राहणार आहेत. शिबिरार्थींच्या आरोग्य व्यवस्थेसाठी वडाळीभोई, धोडंबा, नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेज व परिसरातील डॉक्टस
शिरसाने : शिरसाने (ता. चांदवड) येथील वारकरी अध्यात्मिक ज्ञान बालसंस्कार शिबिरास रविवारपासून ( दि. ३) प्रारंभ होत आहे. बालसंस्कार शिबिर हे रविवार ते शनिवार या कालावधीत होणार आहे. यावेळी शिबिरार्थींना श्रीमद् भागवत गीता अध्याय १२ व १५ योगासने, व्यायाम, हरिपाठ व पावल्या, निवडक अभंग, गायन, मृदुंग, टाळ व वारकरी भजन चाली, संस्कृत भाषण, गंडे रक्षणाचे महत्त्व, संत विचार, स्वावलंबन, देशप्रेम, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव व संस्कार आदि विषयांवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख व मार्गदर्शक म्हणून मधुकर महाराज जाधव, भरत महाराज पानसरे, महेश उफाडे, सागर बोरगुडे, भानुदास भुल्यानेकर, महेश काटे उपस्थित राहणार आहेत. शिबिरार्थींच्या आरोग्य व्यवस्थेसाठी वडाळीभोई, धोडंबा, नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेज व परिसरातील डॉक्टर्स प्रयत्नशील राहणार आहेत. अध्यक्षस्थानी तुकाराम महाराज परसूलकर, उद्घाटक माधव महाराज शिंदे, प्रमुख अतिथी पोपटराव पवार (आदर्श सरपंच हिवरे बाजार, अहमदनगर) काका कोयटे, सोपान महाराज आळंदीकर उपस्थित राहणार आहेत. शिरसाने (ता. चांदवड) येथील बालसंस्कार शिबिरास उपस्थित रहावे, असे शिरसाने ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब जोरे, महेश उफाडे, भरत पानसरे व ग्रामस्थ यांनी केले आहे.
(वार्ताहर)