शिर्डी, मुंबई, हिंगोलीलाही सन्मान, राज्यांच्या वर्गवारीत महाराष्ट्र दुसरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:44+5:302020-08-21T05:00:51+5:30
राज्यातील मुंबई, शिर्डी, हिंगोलीसह अनेक शहरांचाही सन्मान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : स्वच्छ सर्वेक्षण २0२0 मध्ये राज्यांच्या वर्गवारीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून, राज्यातील मुंबई, शिर्डी, हिंगोलीसह अनेक शहरांचाही सन्मान करण्यात आला आहे.
१. एक लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये क्रमांक ३ चे स्वच्छ शहर- नवी मुंबई.
२. शंभरहून जास्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या वर्गवारीत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्रास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.
३. कॅन्टोनमेंट बोर्डांमध्ये देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डास ‘फास्टेस्ट मूव्हर’चा पहिला पुरस्कार.
४. एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेली पहिल्या तीन क्रमांकाची स्वच्छ शहरे : कराड (१), सासवड (२) व लोणावळा (३).
५. पश्चिम विभागात- ५० हजार ते एक लाख लोकसंख्या : सर्वात स्वच्छ शहर, सिटिझन्स फीडबॅक, , सेल्फ सस्टेनेबल सिटी आणि फास्टेस्ट मूव्हर या वर्गांतील पहिले पुरस्कार अनुक्रमे रत्नागिरी, हिंगोली, बल्लारपूर व व शेगाव या शहरांना.
६. पश्चिम विभागात २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या शहरांमध्ये विटा, इंदापूर, शिर्डी आणि वर्धा या शहरांना अनुक्रमे मनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस, सेल्फ सस्टेनेबल सिटी, सर्वात स्वच्छ शहर आणि फास्टेस्ट मूव्हरचे पहिले पुरस्कार.
७. पश्चिम विभागात २५ हजारांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पन्हाळा (सर्वात स्वच्छ शहर), अकोले (इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस) आणि जेजुरी (सेल्फ सस्टेनेबल सिटी) या शहरांना पहिले पुरस्कार.
>यात मात्र राज्यांच्या वाट्याला भोपळा
४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ‘मेगासिटीं’साठी एकूण चार पुरस्कार- बेस्ट सिटिझन्स फीडबॅक, इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस, सस्टेनेबल मेगा सिटी व सर्वात स्वच्छ मेगासिटी. यात महाराष्ट्रातील एकही शहर नाही.
१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ‘बिग सिटी’साठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहर
नाही.३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या मध्यम शहरांसाठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारातही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.
१ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या लहान शहरांसाठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.
>राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची
राजधानी असलेल्या शहरांसाठी
दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.
सिटिझन लेड इनोव्हेशन-एकही नाही.