शिर्डीत आता एकादशीला स्तवनमंजरी वाचन
By admin | Published: January 8, 2016 02:14 AM2016-01-08T02:14:01+5:302016-01-08T02:14:01+5:30
शिर्डी : श्री साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्त विविध उपक्रम चालू करण्याचा मानस शिर्डीकरांनी केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून दर एकादशीला सामुदायिक साईस्तवनमंजरी पठण चालू केले आहे. यासाठी साईस्तवनमंजरी पठण परिवाराची स्थापना करण्यात आली आहे.
Next
श र्डी : श्री साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्त विविध उपक्रम चालू करण्याचा मानस शिर्डीकरांनी केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून दर एकादशीला सामुदायिक साईस्तवनमंजरी पठण चालू केले आहे. यासाठी साईस्तवनमंजरी पठण परिवाराची स्थापना करण्यात आली आहे.या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी एकादशीच्या मुहूर्तावर साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. समाधी शताब्दी होईपर्यंत प्रत्येक एकादशीला हे सामुदायिक वाचन सुरू राहणार आहे़ साई समाधी शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर एकादशीस शिर्डी परिसरातील वाड्या-वस्त्यावरील स्थानिक भाविकांना एकत्रित करून बाबांच्या कार्याचा, विचारांचा, संदेशाचा प्रचार, प्रसार व्हावा, त्या निमित्ताने एकत्रिकरण व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समाधी शताब्दी वर्षात देखील वर्षभर विविध कार्यक्रम केले जाणार आहे.सामुदायिक स्तवनमंजरी पठणाचा उपक्रम शिर्डी परिसरात अथवा बाहेरगावी कोणाच्या घरी घ्यायचा असल्यास त्यांना कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही यासाठी त्यांनी संयोजकांना संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमासाठी शिर्डीचे उपनगराध्यक्ष निलेश कोते,नगरसेवक शिवाजी गोंदकर,कमलाकर कोते,प्रमोद गोंदकर आदी सक्रिय आहेत़ उपक्रमाची माहिती व महत्व ग्रामाचार्य वैभव रत्नपारखी यांनी सांगितले, तर पौरोहित्य मंदिराचे पुजारी बाळा जोशी गुरू यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)