जिल्‘ातील पहिली कॅशलेस व्यवहार करणारी ग्रामपंचायत शिरोली

By admin | Published: January 4, 2017 08:42 PM2017-01-04T20:42:05+5:302017-01-04T20:42:05+5:30

शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्‘ातील इतर सर्व ग्रामपंचायतींनीसुद्धा कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार सुरू करावेत. कॅशलेस व्यवहार सुरू करणारी शिरोली ही जिल्‘ातील पहिली ग्रामपंचायत आहे. इतरांनीही शिरोलीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शासकीय अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी केले. त्या शिरोली ग्रामपंचायतमधील कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. यावेळी आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.

Shiromani Gram Panchayat dealing with the first cashless deal in the district | जिल्‘ातील पहिली कॅशलेस व्यवहार करणारी ग्रामपंचायत शिरोली

जिल्‘ातील पहिली कॅशलेस व्यवहार करणारी ग्रामपंचायत शिरोली

Next
रोली : शिरोली ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्‘ातील इतर सर्व ग्रामपंचायतींनीसुद्धा कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार सुरू करावेत. कॅशलेस व्यवहार सुरू करणारी शिरोली ही जिल्‘ातील पहिली ग्रामपंचायत आहे. इतरांनीही शिरोलीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शासकीय अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी केले. त्या शिरोली ग्रामपंचायतमधील कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. यावेळी आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी भुवनेश्वरी म्हणाल्या, डिजिटल इंडियाअंतर्गत कॅशलेस प्रणालीचा वापर भविष्यात सर्वच ठिकाणी होणार आहे. शिरोली ग्रामपंचायतीने तर सर्वांत पुढे जाऊन ग्रामपंचायतीचे व्यवहार ऑनलाईन केले आहेत हे कौतुकास्पद आहे. तसेच स्वाइप मशीन घेऊन घरफाळा वसुली आणि इतर व्यवहारही कॅशलेस करण्याचे मोठे धाडस केले आहे. शिरोली ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्‘ातील इतर ग्रामपंचायतींनीही ऑनलाईन व्यवहाराकडे वळले पाहिजे. भविष्यात याची गरज भासणार आहे. यावेळी अमल महाडिक यांनीही ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास सरपंच जस्मीन गोलंदाज, उपसरपंच गोविंद घाटगे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खवरे, माधुरी जाधव, डॉ. सोनाली पाटील, सागर कौंदाडे, हरी पुजारी, नंदा कांबळे, शिवाजी कोरवी, लियाकत गोलंदाज, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे उपस्थित होते .
फोटो ओळी :-
शिरोली ग्रामपंचायतीमध्ये स्वाइप मशीनद्वारे कॅशलेस व्यवहाराचे उद्घाटन करताना एस. भुवनेश्वरी. शेजारी आमदार अमल महाडिक, सरपंच जस्मीन गोलंदाज, उपसरपंच गोविंद घाटगे, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे उपस्थित होते.
फोटो- ०३ शिरोली कॅशलेस

Web Title: Shiromani Gram Panchayat dealing with the first cashless deal in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.